श्री. जी. जे. पगारे हे दहेगाव गावाचे ग्रामपंचायत अधिकारी असून गावातील विविध विकास कामांच्या आखणी व अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ते करवसुली, विविध दाखले देणे, बैठकीचे इतिवृत्त लिहिणे, जन्म-मृत्यू नोंदणी तसेच बाल विभाग प्रतिबंध आणि आपत्कालीन समितीचे सचिव म्हणून कार्य करतात. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात ते नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या कार्यकाळात शासनाकडून मिळणाऱ्या अनेक घरकुलांच्या योजना पूर्ण झाल्या असून लोकांची निवारा ही महत्त्वाची गरज भागवली आहे. तसेच 15 वा वित्त आयोग अनुदान आराखड्यानुसार सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत.
Contact