दहेगाव हे नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गाव आहे. हे गाव नाशिक तालुका सीमेवर वसलेले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार येथे सुमारे 1573 लोकसंख्या आहे. गावातील बरेच लोक सुशिक्षित असून बहुसंख्य सदन शेतकरी आहेत. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून द्राक्ष, कांदा, कडधान्ये आणि धान्य पिके येथे घेतली जातात.
शिक्षणाच्या दृष्टीने गावात जिल्हा परिषद शाळा तसेच जनता विद्यालयासारख्या संस्था आहेत. प्राथमिक स्तरावरचे शिक्षण गावातच मिळते, मात्र उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नाशिकसारख्या शहरात जावे लागते. शाळांमध्ये वर्गखोल्या, खेळाचे मैदान उपलब्ध असले तरी संगणक प्रयोगशाळा आणि समृद्ध ग्रंथालय यांचा अभाव जाणवतो. तरीदेखील पालकांचा शिक्षणाकडे कल मोठ्या प्रमाणावर असून गावातील विद्यार्थी प्रगतीपथावर आहेत.
गावातील पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा झालेली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून आता प्रत्येक घराला नळजोडणी मिळाली आहे. या योजनेमुळे स्वच्छ पाण्याची उपलब्धता सोपी झाली आहे. वाहतूक सुविधांमध्ये एस.टी. बससेवा आहे, पण प्रवासात काही अडचणी निर्माण होतात. आरोग्य सेवा व रस्त्यांची दुरुस्ती याबाबत अजूनही सुधारणा आवश्यक आहे.
शेतीसोबतच दहेगावात पर्यटनालाही स्थान मिळाले आहे. गावात मारुतीचे जुने मंदिर आहे, तसेच शिवकालीन घारगड किल्ला आहे. येथे सवाना रिसॉर्टसारखी सुविधा असून त्यामुळे गावाकडे बाहेरील लोकांचे आकर्षण वाढले आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन, मोफत पाठ्यपुस्तके, पोषण आहार आणि शालेय बस अशा सुविधा पुरवल्या जात आहेत.
एकंदरित पाहता दहेगाव हे सुशिक्षित व प्रगतिशील लोकांचे गाव असून शेती, शिक्षण, पर्यटन आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात ते सतत प्रगती करत आहे. सामाजिक-आर्थिक आव्हाने असली तरी ग्रामस्थांचा उत्साह आणि शैक्षणिक जाणीवा यामुळे दहेगाव भविष्यात आणखी सक्षम होईल.
सरपंच
सौ. शीतल गोकुळ बेंडकोळी या दहेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच असून त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वच्छता मोहीम, जलजीवन मिशन, शालेय सुविधा व मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन या क्षेत्रांत त्यांचे विशेष योगदान आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून विकास घडविण्याचा त्यांचा दृष्टीकोन ग्रामपंचायतीच्या कामकाजात स्पष्ट दिसतो.
ग्रामपंचायतीचे निर्णय अधिक पारदर्शक व सर्वसमावेशक व्हावेत यासाठी त्यांनी डिजिटल ग्रामसुविधा, शासकीय योजना प्रचार व महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवले आहेत. गावाला प्रगतिशील व आदर्श बनविणे हे त्यांचे ध्येय असून त्यांच्या नेतृत्वामुळे दहेगाव सतत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
10/08/2025, 08:35 am
ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. या ग्रामसभेत गावाच्या गरजा, प्राधान्यक्रम, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, रोजगार निर्मिती अशा विविध विषयांवर चर्चा करून आगामी विकास आराखडा तयार केला जातो. ग्रामस्थांचा सहभाग आणि सूचना या अभियानाच्या यशासाठी मोलाच्या ठरतात.
20/07/2025, 10:00 am
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत दहेगावात महिला सभा आयोजित करण्यात आली. या सभेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि उपक्रमांवर मार्गदर्शन करण्यात आले.
19/07/2025, 10:00 am
दहेगाव येथे 19 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या सभेत ग्रामविकासासाठी महत्त्वाचे विषय व विविध योजनांवर चर्चा करण्यात आली.
16/07/2025, 10:22 am
ग्रामातील महिलांना उद्योजकतेसाठी प्रशिक्षण व आर्थिक मदत देण्यासाठी महिला सक्षमीकरण उपक्रमाचा शुभारंभ पार पडला, ज्यामुळे महिलांचा उत्साह वाढला.
हर घर जल हर घर नल योजनेमार्फत सर्व कुटुंबाना स्वतंत्र नळ कनेक्शन
प्राथमिक व माध्यामिक १ ते १० शाळा
महिलांना ग्रामपंचायत कडून विविध कौशल्य विकास प्रशिक्षण दिले आहे.
गावात सामाजिक सभा मंडप भगवान शंकर मंदिर आणि मारुती मंदिर येथे असून सार्वजनिक कार्यक्रम विवाह सोहळा वर्षश्राद्ध , धार्मिक विधी होतात
जनसुविधा अंतर्गत दुमजली सुसज्य ग्रामपंचायत कार्यालयाचे काम प्रगती पथावर
नागरिकांसाठी दाखले वितरण व online सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे सेंटरख्या
ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना व युवतींना मासिक पाळी व्यवस्थापनासाठी वर्षभर सेनेटरी पॅड चा पुरवठा केला जातो.
ग्रामपंचायतीकडून मयत व्यक्तींचा गोशाळे मार्फत पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार मोफत केला जातो.
भगवान हनुमानाची जन्मभूमी म्हणून ओळखले जाणारे हे ऐतिहासिक ठिकाण, ट्रेकर्स व पर्यटकांसाठी लोकप्रिय.
दहेगावच्या जवळ वसलेले बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थान, दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
गावात व परिसरात विकसित झालेले पर्यटन स्थळ, निसर्गरम्य वातावरण आणि आधुनिक सुविधा यामुळे पर्यटकांचे आकर्षण.
गावातील प्राचीन मारुतीचे मंदिर हे भक्तीभावाचे केंद्र असून धार्मिक वातावरणामुळे पर्यटकांना आकर्षित करते.
शिवकालीन इतिहास सांगणारा हा किल्ला निसर्गरम्य डोंगररांगेत वसलेला आहे. इतिहासप्रेमी व ट्रेकर्ससाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
डांग्या किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून वनौषधींचा खजिना आहे. येथे विविध औषधी वनस्पती आढळतात ज्यांचा उपयोग पारंपरिक उपचारांमध्ये केला जातो. त्यामुळे हा किल्ला नैसर्गिक संपत्ती व आरोग्यदायी वारसा जपणारे पर्यटनस्थळ मानले जाते.