02/09/2025, 11:27 am
गावात कंपोस्ट खड्डा तयार करून ओला-सुका कचऱ्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर केले जाते. तसेच सिग्रीगेशन शेड मध्ये प्लास्टिक, रबर, लोखंड, काच यांचे वर्गीकरण करून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते.
11/09/2025, 08:30 pm
गावातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून लघुउद्योग व प्रशिक्षण दिले जाते. या योजनेमुळे महिलांना आर्थिक बळकटी मिळून त्यांचे सामाजिक योगदान वाढते.
11/05/2025, 03:29 am
गावात जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक घराला स्वच्छ व सुरक्षित पाणी नळजोडणीद्वारे उपलब्ध होत असून ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा सुलभ झाल्या आहेत.